Suburban Railway passengers to enjoy free of cost data connectivity offered by Central Railway (Mumbai) and Sugar Box Networks

उपनगरी रेल्वे प्रवाशांना मिळणार निःशुल्क डेटा कनेक्टिविटीचे लाभ मध्य रेल्वे (मुंबई) आणि शुगरबॉक्स नेटवर्क्सचा उपक्रम

मुंबई: मध्य रेल्वे (मुंबई डिव्हिजन) आणि जगातील पहिला हायपरलोकल एज क्लाऊड प्लॅटफॉर्म शुगर नेटवर्क्स 'शुगरबॉक्स नेटवर्क्स' यांनी जगातील एका सर्वात व्यस्त सार्वजनिक वाहतूक नेटवर्कमध्ये डिजिटल उपलब्धतेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी भागीदारी केली आहे. आजपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण रेल्वे प्रवासात मागणीप्रमाणे, संबंधित डिजिटल ऍप्सचा उपयोग करता येईल. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अनिल कुमार लाहोटी यांनी शुगरबॉक्स नेटवर्क्सचे सह-संस्थापक श्री. रोहित परांजपे, रिपुंजय बारारिया देवांग गोराडिया मुंबई डिव्हिजनचे डीआरएम श्री. शालभ गोयल यांच्या समवेत एका पत्रकार परिषदेत घोषणा करून या सेवांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांचे इतर सहकारी अधिकारी देखील उपस्थित होते.

नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपल्या ग्राहकांना प्रदान केल्या जाणाऱ्या अनुभवांमध्ये अधिकाधिक वाढ सुधारणा करण्याच्या मध्य रेल्वेच्या भविष्यवेधी उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये ही भागीदारी हे एक योगदान ठरणार आहे. रेल्वे प्रवाशांना विश्वसनीय आणि किफायतशीर डिजिटल अनुभव मिळवण्यासाठी सक्षम बनवणे हे या दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे.  आता उपनगरी रेल्वेमधून (मध्य रेल्वे) प्रवास करताना, सेल्युलर नेटवर्क अनियमित असताना किंवा अजिबात उपलब्ध नसताना देखील माहिती, मनोरंजन, खरेदी, शिक्षण, कौशल्यवृद्धी सेवा, पेमेंट प्लॅटफॉर्म्स या अशा अनेक डिजिटल सेवासुविधांचा अखंडित अनुभव घेता येईल.

अभिनव तंत्रज्ञान सुविधांसह प्रगतीशील पावले उचलण्यावर ठाम विश्वास असलेले, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले, "मध्य रेल्वे हा मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे.  दररोज तब्बल ४५ लाख प्रवासी आमच्या उपनगरी नेटवर्कचा (कोविड-पूर्व काळात) लाभ घेतात.  हे प्रवासी रेल्वे प्रवासाला लागणाऱ्या वेळेचा उपयोग आपापल्या डिव्हायसेसवर विविध सेवासुविधांचा लाभ घेण्यासाठी करत असतात.  त्यामुळे जर आम्ही आमच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करून त्यांना यासाठी अधिक जास्त सक्षम बनवू शकलो तर त्यामुळे भविष्यासाठी सज्ज राहण्याचे ग्राहककेंद्री धोरण अवलंबिण्याचे आमचे लक्ष्य अधिक बळकट होईल.  तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या ग्राहककेंद्री धोरणामध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने उचलले गेलेले पाऊल म्हणजे शुगरबॉक्ससोबत करण्यात आलेली ही भागीदारी. मला खात्री आहे की, डिजिटल इंडिया अभियानात योगदान देण्याच्या दृष्टीने ही भागीदारी खूप मोलाची ठरेल."                  

उपलब्ध असलेल्या डिजिटल सेवांचा लाभ सर्वांना, सगळीकडे घेता आला पाहिजे हा यामागचा उद्देश आहे.  प्रवाशांची एक तक्रार हमखास असते, ती म्हणजे प्रवासात असताना कन्टेन्ट स्ट्रीम किंवा डाउनलोड करण्यासाठी, पेमेंट्स करण्यासाठी चांगले डेटा नेटवर्क उपलब्ध नसते, त्यामुळे कन्टेन्टचा लाभ घेता येत नाही, पेमेंट्स करता येत नाहीत किंवा अनियमित कनेक्टिव्हिटीमुळे काहीवेळा जास्त पेमेंट केले जाते.  देशभरात आणि जगभरात प्रवाशांना भेडसावणाऱ्या या समस्यांचे निवारण व्हावे यासाठी शुगरबॉक्स नेटवर्क्स नवनवीन सेवासुविधा निर्माण करत आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी सेवासुविधा निर्माण करण्यासंदर्भात शुगरबॉक्स नेटवर्क्सचे सह-संस्थापक सीईओ श्री. रोहित परांजपे यांनी सांगितले, "मुंबईकरांचा बहुतांश वेळ प्रवासात जातो, त्यामुळे प्रवास करत असताना त्यांना डिजिटल कनेक्टिव्हिटी सतत आणि अखंडपणे उपलब्ध असणे गरजेचे आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही मुंबई हे प्रवासातील उत्तम कनेक्टिव्हिटीचे ठळक उदाहरण बनवू इच्छितो. मुंबईतील रेल्वे प्रवासी प्रवासात असताना देखील डिजिटली सक्षम असावेत असे आम्हाला वाटते.  उपनगरी रेल्वेमार्गावरील प्रवाशांना प्रवासात असताना शून्य बफरिंग आणि अतिशय वेगवान इंटरनेट सेवांसह डिजिटल अनुभव प्रदान करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना, ते कुठेही असले तरी आणि त्यांना किती काय परवडू शकते याचा संबंध येता, अधिक वेगवान, संपूर्णपणे विश्वसनीय खूप स्वस्त डिजिटल सेवा पुरवून भविष्यातील ट्रेन्ससाठी सज्ज राहणे आमचे लक्ष्य आहे."

"शुगरबॉक्स नेटवर्क्स"च्या पेटंटेड हायपरलोकल एज क्लाऊड तंत्रज्ञानाचा सर्वाधिक भर प्रवाशांना सर्वोत्तम प्रवास अनुभव प्रदान करण्याच्या मध्य रेल्वेच्या वचनबद्धतेला अधिकाधिक मजबूत करण्यावर आहे.

Comments