In a unique way, the music and trailer launch of the Marathi film 'Varhadi Vajantri' at the Citylight cinema in Mumbai!

अनोख्या पद्धतीत मराठी चित्रपट 'वऱ्हाडी वाजंत्री'चे मुंबईतील सिटीलाईट चित्रपटगृहात म्युझिक ट्रेलर लाँच!

मुंबई: खरं तर दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विवाह सोहळ्यांची धूम सुरू होते, पण यंदा दिवाळीपूर्वीच 'वऱ्हाडी वाजंत्री'चा गाजावाजा होऊ लागला आहे. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री' या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरेसंगे चित्रपटातील इतर कलाकारांनी धरलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री'च्या ठेक्यावर महाराष्ट्रातील तमाम सिनेप्रेमींचे पाय थिरकणार आहेत. या चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी अनोखी शक्कल लढवत संगीतकार अविनाश - विश्वजित, शशांक पोवार आणि लोकशाहीरी कला जोपासणारे, बाजीराव मस्तानी, तानाजी अनसंग वारीअर अश्या अनेक चित्रपटांत पार्श्वगायन करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि वऱ्हाडी वाजंत्री हे टायटल सॉंग गायलेले हरहुन्नरी कलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 'वऱ्हाडी वाजंत्री' हे शीर्षक गीत वाद्य सुरावटीद्वारे प्रत्यक्ष सादर करीत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. या अनोख्या सोहळ्यात सर्व गायक, संगीतकार आणि कलाकारांनी सहभाग घेत शोभा वाढविली. संगीत प्रदर्शनानंतर या चित्रपटाचा खुमासदार ट्रेलर आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे, पंढरीनाथ कांबळी, विजय कदम, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, पूर्णिमा अहिरे, राजेश चिटणीस, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर, सहनिर्माते अतुल राजारामशेठ, दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शित होताच सभागृहात हास्याचे कारंजे फुलू लागले होते.

 

११ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी स्वराज फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. वैभव अर्जुन परब यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा संवादलेखन केलं असून, दिग्दर्शन विजय पाटकर यांनी केलं आहे. 'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटात तीन सुमधूर गाणी असून, अविनाश-विश्वजीत शशांक पोवार या संगीतकार त्रयींनी ती संगीतबद्ध केली आहेत. 'वऱ्हाडी वाजंत्री' हे टायटल साँग शशांक पोवार यांनी संगीतबद्ध केलं असून, गीतकार राजेश बामुगडे हे तिन्ही गीतांचे गीतकार आहेत. लोकप्रिय गायक आदर्श शिंदे, नंदू भेंडे, आनंदी जोशी, मैथिली पानसेजोशी, गणेश चंदनशिवे यांनी ती गायली आहेत.

 

'छू मंतर छू' या गाण्यात मोहन जाशी आणि रिमा यांनी रेट्रो लुक कोरिओग्राफर उमेश जाधव यांच्या तालावर ताल धरला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आणि पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळी यांनीदोन जीवांची होईना भेट' या गाण्यात अफलातून गंमत आणली आहे. राजेश बिडवे यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री' ह्या जबरदस्त ठेका असलेल्या टायटल सॉंगमध्ये सर्वच कलाकार दिसत असल्याने तालासुरात हे गीत पाहताना कलरफुल दिसते. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, रीमा, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांना सहनिर्माते म्हणून अतुल राजारामशेठ ओहळ यांनी साथ दिली आहे.

 

या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन वैभव अर्जुन परब यांनी लिहिले आहेत तर छायाचित्रण शैलेश अवस्थी यांचे असून संकलक स्व. सलोनी कुलकर्णी, हेमंत गायकवाड आहेत. कला दिग्दर्शक गिरीश कोळपकर असून वेशभूषा गीता गोडबोले, पोर्णिमा ओक यांनी केली आहे तर कार्यकारी निर्माता इंदुराव कोडले पाटील आहेत. सह दिग्दर्शक मनोज सहदेव माळकर असून विज्युअल प्रमोशन संकलक दिनेश मेंगडे आहेत. साऊंड डिजाईनर शेखर भगत तर पार्श्वसंगीत रवींद्र खरात यांचे आहे. रंगभूषा अजित पवार तर जाहिरात संकल्पना मिलिंद मटकर यांची आहे. प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख राम कोंडू कोंडीलकर असून डिजिटल मार्केटिंग ब्रँडिंग तुषार रोठे पाहत आहेत. ध्वनीमुद्रण सुरेश कचवे यांनी तर पुनॆ: ध्वनिमुद्रक केविन गाला आहेत. स्थिरचित्रण राम वासनिक यांनी तर जाहिरात स्थिरचित्रण प्रथमेश रांगोळे यांनी केले आहे. पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ डीजीटोन येथे करण्यात आले असून चित्रपट वितरकजयेश मिस्त्री यांची युजेएम नेटवर्क्स एन एन्टरटेनमेंट एलएलपी संस्था करीत आहे.


 

Comments