मुथ्थुट फायनान्सतर्फे दिल्लीतील मुथ्थुट विवाहसन्मानम प्रकल्पासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
मुंबई: "मुथ्थुट फायनान्स लि." या भारतातील सर्वात मोठ्या सुवर्ण कर्ज पुरवठादार कंपनीने दिल्लीतील मुथ्थुट विवाहसन्मान प्रकल्पासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे. २०२३ पॅजंट हा अनोखा सीएसआर उपक्रम असून त्याद्वारे विधवांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. हा उपक्रम डिसेंबर २०२३ दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला ५०,००० रुपयांचे भरघोस आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. बेंगळुरू, हैद्राबाद, मेंगलोर, मदुराई, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली व मुंबई अशा आठ ठिकाणचे प्रत्येकी १० लाभार्थी व असे ८० लाभार्थी निवडले जाणार आहेत. त्यासाठी पात्र ठरण्यासाठी लाभार्थीचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मुथ्थुट फायनान्सद्वारे मुथ्थुट विवाहसन्मान प्रकल्प २०२३ साठी एकूण ४० लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून त्याद्वारे कंपनी आपली बांधिलकी नव्याने अधोरेखित करणार आहे. कंपनीने यापूर्वी विधवा मातांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी १५ कोटींचे योगदान दिले आहे. या उपक्रमाचे सहकार्य लाभलेले विवाह १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान संपन्न होणार आहेत. हा प्रकल्प मुथ्थुट फायनान्सच्या समाजाला सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेतला महत्त्वाचा भाग आहे.
या निधीविषयी मुथ्थुट फायनान्सचे सीएसआर प्रमुख श्री. बाबू जॉन मल्याळी म्हणाले, ‘लग्नामुळे एखाद्या कुटुंबावर किती ताण येतो याची आम्हाला कल्पना आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटापुढे अशा परिस्थितीत किती मोठे आव्हान उभे राहाते हे आम्हाला माहीत आहे. विधवा मातांना आर्थिक मदत करून आम्ही हा आर्थिक ताण कमी करण्याचे व नववधूंना कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय त्यांच्या स्वप्नातला लग्न समारंभ अनुभवता येईल याची खात्री करणार आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुथ्थुट फायनान्स नववधूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे योगदान देणार असून त्यांना कोणत्याही आर्थिक बोज्याशिवाय लग्नाचा आनंद घेणे शक्य होणार आहे.’
हे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी पात्र मुलींच्या मातांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
1. पांढऱ्या कागदावर मुथ्थुट फायनान्सच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावे विनंती पत्र.
2. स्थानिक नगरसेवक/पंचायत सदस्य/आमदार यांच्याकडून शिफारस पत्र
3. लग्नाची तारीख दर्शवणारे पत्र किंवा लग्नपत्रिका किंवा अर्जाची वैधता दर्शवणारे इतर कोणतीही कागदपत्रे
4. रेशन कार्ड आणि आधार कार्डाची प्रत
5. उत्पन्नाचा दाखला
6. मुलीची आई विधवा किंवा एकल माता असल्याचे दर्शवणारा मृत्यूचा दाखला किंवा इतर कागदपत्र
वर नमूद केलेल्या कागदपत्रांसह अर्ज पुढे दिलेल्या पत्त्यावर २५ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अर्जाच्या पाकिटावर ‘लग्न भेटीसाठी अर्ज’ असे लिहिलेले असावे.
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता:
श्री सोनू गौंड
व्यवस्थापक सीएसआर
मुथ्थुट फायनान्स लि.,
स्वामी विवेकानंद रस्ता,
नवी कॉलनी, मामलेदार वाडी,
सारस्वत बँकेच्यावरती, मालाड (पश्चिम),
मुंबई-400064
9773507004

Comments
Post a Comment