Mamaearth celebrates a major milestone with the opening of its 100th store exclusive brand outlet in Mumbai

मामाअर्थने मुंबईत त्याचे १००वे स्टोअर एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट उघडून एक मोठा मैलाचा दगड साजरा केला

मुंबई: भारतातील सर्वात मोठी डिजिटल-फर्स्ट ब्युटी अँड पर्सनल केअर (बीपीसी) 'होनासा कंझुमर लिमिटेड' अंतर्गत प्रमुख ब्रँड "मामाअर्थ" कंपनीने मुंबईत 100 व्या विशेष ब्रँड आउटलेट (ईबीओ) चे उद्घाटन केले. घाटकोपरच्या गजबजलेल्या आर-सिटी मॉलमध्ये वसलेले, हे नवीन स्टोअर मामाअर्थच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा दर्शविते आणि विषमुक्त पर्सनल केअर उत्पादने सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या त्याच्या वचनबद्धतेला बळकट करते. या स्टोअरचे उद्घाटन संस्थापक- गझल अलघ आणि वरुण अलघ यांच्यासह प्रसिद्ध इंफ्लुएंसर मुंबईकर निखिल म्हणून ओळख असलेले निखिल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्राहकांशी इमर्सिव्ह पद्धतीने कनेक्ट होण्याच्या उद्देशाने, एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्सने ब्रँडला अधिक समृद्ध ब्रँड अनुभव बनविण्यासाठी आणि ऑफलाइन रिटेल वातावरणात त्यांच्याशी संलग्नता वाढवण्यास मदत केली. एक उत्तम अनुभव केंद्र असण्यासोबतच, एक्सक्लुझिव्ह स्टोअर्सनी कलर कॉस्मेटिक्स सारख्या धोरणात्मक श्रेणींचा विकास केला आहे ज्यांना खरेदी रूपांतरण सुलभ करण्यासाठी अधिक वैयक्तिकृत सेवा आणि अनुभव आवश्यक आहे. 2021 च्या सुरुवातीस त्याच्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन झाल्यापासून, मामाअर्थने उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे आणि 100 व्या स्टोअरचे उद्घाटन हे 'मामाअर्थ'ची उत्पादने ऑफलाइन देखील उपलब्ध करून देण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेचा खरा पुरावा आहे. गेल्या वर्षभरात, मामाअर्थने 250+ एसकेयू कलेक्शन समाविष्ट करण्यासाठी त्याच्या उत्पादन श्रेणीच्या वैविध्यतेसह किरकोळ स्टोअरच्या संख्येत प्रभावी वाढ अनुभवली आहे.

एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेटच्या लॉन्च बद्दल टिप्पणी करताना, श्री वरुण अलघ, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, होनासा कंझुमर लिमिटेड म्हणाले,"एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्समध्ये प्रवेश म्हणजे ब्रँडची ओम्नी चॅनल उपस्थिती निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नाचा विस्तार आहे. विक्रमी वेळेत मामाअर्थसाठी उल्लेखनीय शतकाचा टप्पा गाठण्याच्या आमच्या टीमच्या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही आमच्या ग्राहकांचे खरोखर आभारी आहोत ज्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले, ज्यामुळे या वाढीला चालना मिळाली. होनासा येथे, आम्ही पर्सनल केअर समस्या सोडवण्याबरोबरच एक उद्देश पूर्ण करणारे ग्राहक ब्रँड तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही यासाठी वचनबद्ध राहून ग्राहकांना सेवा देत राहण्याचे वचन देतो".

'मामाअर्थ' हा पर्पज लीड ब्रँड आहे जो ‘गुडनेस इनसाइड’ या तत्त्वावर ठाम विश्वास ठेवतो आणि त्याची उत्पादने आणि उपक्रमांद्वारे चांगुलपणा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे. 'मामाअर्थ' च्या मुंबईतील 100 व्या स्टोअरचे उद्घाटन हे ब्रँडच्या प्रवासातील एक उत्कृष्ट यश आणि एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे.

 

Comments