SMFG India Credit Treats 1 Lakh+ Cattle at 6th Pashu Vikas Day, Celebrates Women in Dairy Farming

SMFG इंडिया क्रेडिट तर्फे ६ व्या पशु विकास दिनानिमित्त १ लाखांहून अधिक गुरांवर उपचार; दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

केंद्र: भारतातील आघाडीच्या NBFC पैकी एक, "SMFG इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड" (पूर्वीचे फुल्लरटन इंडिया क्रेडिट को. लिमिटेड) ने त्यांच्या ६ व्या 'पशु विकास दिवशी' (PVD), सर्वात मोठे एकदिवसीय पशुविकास शिबिर आयोजित केले. ही शिबिरे १४ राज्यांमधील ४६० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आली आणि १ लाखांहून अधिक गुरांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यात आली.

भारतात, ८ कोटींहून अधिक कुटुंबे थेट दुग्धव्यवसायाशी निगडीत आहेत आणि या क्षेत्राच्या कार्यशक्ती मध्ये स्त्रियांचे प्रमाण ७०% आहे. या महिलांच्या प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी ६ वा पशु विकास दिन 'दुग्ध व्यवसायातील महिला' म्हणून साजरा करण्यात आला. स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी सर्वांचा सहभाग यावर भर देत हा उपक्रम ईएसजी चौकटीमधील 'सामाजिक' पैलू प्रतिबिंबित करतो.

पशु निगा आणि उपचार यांच्या जोडीला SMFG इंडिया क्रेडिटने ३०,००० हून अधिक लोकांना लाभ मिळवून देत ४-१० फेब्रुवारी दरम्यान देशभरात ३०० हून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. ६ व्या पशु विकास दिवसाने १,२५,००० हून अधिक जीवनांना स्पर्श केला आणि त्यांच्यावर प्रभाव पाडला.

या कंपनीचा वैविध्यपूर्ण कामगारसंच हा धोरण पूरक आहे कारण ते संपूर्ण भारताच्या ६०० शहरे आणि ६५,००० हून अधिक गावांमधील ग्राहकांना सेवा प्रदान करतात. त्यांचे लक्ष्य हे सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करून ऋणाद्वारे स्वप्नपूर्ती आणि उच्च कौशल्य प्रदान करून ग्रामीण जीवनाचे जीवनमान उंचावने आहे.

पशु विकास दिनामध्ये देशभरातील ४००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. हा उपक्रम राबविण्यासाठी एकाच दिवशी त्यांनी एकत्र येऊन स्वयंसेवेने काम केले.

कंपनीच्या सामाजिक उपक्रमांबद्दल बोलताना, SMFG इंडिया क्रेडिट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. शंतनू मित्रा म्हणाले, “आमच्या ग्रामीण भागातील ग्राहकांपैकी ९०% हून अधिक ग्राहक या महिला आहेत. आमचे बरेच ग्राहक त्यांच्यासाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत असलेल्या गुरे खरेदीसाठी कर्ज घेतात. आमचे समाज विकास कार्यक्रम बदलासाठी चालना देणारे घटक म्हणून काम करतात आणि ग्रामीण जीवनमान उंचावण्यावर, जीवनाची एकूण गुणवत्ता वाढवण्यावर आणि उत्पन्नाच्या प्रवाहांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतात. पशुधन कल्याणाच्या पलीकडे आणि सेवा देत असलेल्या समुदायांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कौशल्य विकास आणि आर्थिक साक्षरतेला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहोत. SMFG इंडिया क्रेडिट कंपनी मध्ये आम्ही नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक उपक्रमांद्वारे वंचित  समाजामध्ये सर्वसमावेशक वाढीस प्रोत्साहन देऊन आमच्या ग्राहकांशी मजबूत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी समर्पित आहोत.

पशु विकास दिनावर भाष्य करताना SMFG इंडिया क्रेडिट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामीनाथन सुब्रमण्यन म्हणाले, “SMFG इंडिया क्रेडिटमध्ये आम्ही ग्रामीण विकास आणि मजबूत सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या बांधिलकीबाबत ठाम आहोत. अग्रगण्य कर्ज पुरवठादार म्हणून सामुदायिक सर्वदूर उपक्रम, सर्वसमावेशक कार्यक्रम आणि एकसंधपणे काम करणारे वैविध्यपूर्ण कर्मचारी यांच्या माध्यमातून ईएसजीच्या 'सामाजिक' पैलूचा उपयोग करण्याची आमची इच्छा आहे. ग्रामीण भागातील गुरेढोरे आणि त्यांच्या मालकांच्या विशिष्ट आरोग्यसेवा लक्षात घेऊन हा पशु विकास दिन आयोजित केला आहे. हा कार्यक्रम पशुपालकांच्या आकांक्षांना सामर्थ्य देतो आणि पशुधन उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे  घरगुती उत्पन्नात वाढ होते. आमचा उद्देश केवळ आमच्या ग्राहकांचेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात समुदायाचे सक्षमीकरण आणि प्रगती करत वंचितांना शाश्वतपणे पाठिंबा देण्यावर असेल”.

'पशु विकास दिन' हा सकारात्मक बदल घडवण्यासाठी अतूट बांधिलकीचे उदाहरण देतो आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात शाश्वत पद्धतींना चालना देतो. यावर्षी कंपनीने देशभरात आयोजित सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुविकास शिबिरांसाठी वर्ल्ड रेकॉर्ड युनियनसह नवा विक्रम केला आहे. गेल्या काही सत्रामध्ये, PVD ची 2015 च्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये भारतभरात सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुविकास शिबिराच्या आयोजना साठी, 2018 मध्ये बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स द्वारे जगभरातील सर्वात मोठे एक दिवसीय पशुविकास शिबिर म्हणून आणि 2019 मध्ये वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्स द्वारे सर्वात मोठे पशुविकास शिबिर म्हणून नोंद झाली.


 

Comments