बिर्ला ओपस तर्फे ' मेक लाईफ ब्युटीफूल ' मोहिमेची सुरुवात करत केला नव्या प्रवासाचा प्रारंभ
मुंबई: “बिर्ला ओपस पेंट्स” या आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम इंडस्ट्रीजच्या ब्रॅन्ड तर्फे आज त्यांच्या नवीन संभाषणाची सुरुवात केल्याची घोषणा केली आहे. या फिल्म मध्ये बिर्ला ओपसचे ब्रॅन्ड तत्वज्ञान आणि टॅगलाईन असलेल्या ‘मेक लाईफ ब्युटीफूल’ ला पुन्हा जिवंत करण्यात आले आहे. या नवीन विषयावर आधारीत संभाषणा मध्ये बिर्ला ओपसकडून ब्रॅन्डची बदलाची शक्ती दाखवण्यात आली असून यामुळे तुम्ही तुमचे जग अधिक सुंदर करु शकता.हि फिल्म प्रथमच हायडेफिनेशन सह ३डी फीचर ॲनिमेशनसह रिॲलिस्टिक सिल्होट्सच्या माध्यमातून तयार करण्यात आली असून भारतात या पेंट विभागात प्रथमच कोणत्याही ब्रॅन्डने अशा प्रकारच्या वैशिष्ट्यांचा या जाहिरातीत वापर केला आहे. या चित्रपटासाठी चा जो ट्रॅक आहे त्याची निर्मिती ही प्रसिध्द भारतीय गीतकार राम संपत यांनी केली असून ‘दुनिया को रंग दो’ (दुनियेला रंगीत करा) असा संदेश या गीताच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या नवीन जाहिराती मुळे बिर्ला ओपस पेंट्स ने आणखी एक मैलाचा दगड पूर्ण करत संपूर्ण देशात आपले अस्तित्व वाढवले आहे. ही फिल्म हिंदी आणि अन्य महत्त्वाच्या भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आली असून त्याच बरोबर टिव्ही, डिजिटल, ओओएच, प्रिंट आणि रेडिओ सह ३६० अंशातील प्रसार करण्यात येणार असून त्यामुळे या जाहिरातीच प्रचार आणि अभ्यासही करण्यात येणार आहे. या संभाषणाची संकल्पना ही लिओ बर्नेट ची असून निर्मिती ही ब्राझिलचा आघाडीचा ॲनिमेशन स्टुडिओ असलेल्या झोंबी स्टुडिओ ने केली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये आदित्य बिर्ला ग्रुपने पेंट क्षेत्रात प्रवेश करुन बिर्ला ओपसची सुरुवात केली. आपला पेंटचा व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी कंपनी ने देशभरात २०२५ पर्यंत सहा उत्पादन केंद्रे सुरु करण्याची योजना आखली आहे.
या फिल्मच्या सुरुवाती विषयी बोलतांना बिर्ला ओपसचे सीईओ रक्षित हरगावे यांनी सांगितले “आम्ही आमच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा जाणतो, हे ग्राहक उत्पादन आणि अनुभव हा त्यांच्या उद्दिष्ट्य आणि मुल्यानुसार घेऊ इच्छित असतो. या फिल्म मधील खेळकरपणामुळे आम्ही ब्रॅन्डचा विश्वास असलेल्या ‘मेक लाईफ ब्युटिफूल’ला वैयक्तिक करत आहोत, आमच्या ग्राहकांसह बदल घडवण्याच्या या प्रवासाला सुरुवात करतांना आम्ही खूप आनंदी आहोत, यासह आम्ही उद्दिष्ट्यासह सौंदर्य त्यांच्या जीवनात आणू इच्छितो”.
बिर्ला ओपसचे मार्केटिंग हेड इंदरप्रीत सिंग यांनी सांगितले “बिर्ला ओपस च्या पहिल्यावहिल्या ब्रॅन्ड फिल्मची सुरुवात करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत. ही फिल्म जगातील सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन स्टाईल्सने युक्त आहे आणि हॉलिवूडच्या एचडी मुव्हीज बरोबर तुलना करण्यायोग्य आहे, ही भारतातील पेंट क्षेत्रातील पहिली अशी फिल्म आहे. ‘दुनिया को रंग दो’ हा संदेश प्रसिध्द संगीतकार राम संपत यांनी तयार केला असून यामधून आशा, आंनद आणि जीवनाचे सौंदर्य अशा संकल्पना पुढे आणण्यात येत आहेत”.
लिओ बर्नेटच्या दक्षिण एशियाचे चेअरमन आणि पब्लिसिस ग्रुप च्या दक्षिण एशियाचे सीसीओ राजदीपक दास यांनी सांगितले “बिर्ला ओपस हा ब्रॅन्ड आजच्या डायनॅमिक अशा नवीन भारतीय प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे. आणि म्हणूनच आंम्हाला या मोहिमेला ताजातवाना आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन द्यायचा होता. गोष्ट सांगण्यासाठी ॲनिमेशनचा वापर करुन आमच्या फिल्म मध्ये कलात्मक दृष्टिकोन देऊन कशा प्रकारे प्रेक्षक त्यांच्या जवळपासशी जोडून रंग त्यांच्या जीवनात कसे प्रोत्साहन देऊन बदल घडवतात हे दर्शवले आहे”.
Comments
Post a Comment