गोदरेज आणि बॉयसच्या सिक्युरिटी सोल्युशन्स डिव्हिजनने हुमायूनच्या मकबऱ्याला सुरक्षित करून गती प्राप्त केली
भारत: “गोदरेज एंटरप्रायझेस” ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज आणि बॉयसच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने देशातील प्रतिष्ठित संस्था, महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प, ऐतिहासिक वास्तू आणि सरकारी परिसर अशा अनेक ठिकाणांसाठीचे 35 कोटींहून अधिक किमतीचे उच्च-मूल्याचे सुरक्षा करार यशस्वीरीत्या मिळविले आहेत. त्यातून कंपनीने महत्त्वाच्या राष्ट्रीय ठिकाणांसाठी सर्वसमावेशक सुरक्षा उपाय पुरविणारी भारतातील अग्रगण्य कंपनी म्हणून स्थान मिळविले आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रकल्पांमध्ये संपूर्ण भारतातील BPCLच्या ठिकाणी इंटिग्रेटेड आउटसोर्स्ड वर्कफोर्स मॅनेजमेंट सीस्टम (IOWMS) ची अंमलबजावणी आणि हुमायूनच्या मकबरा, नया रायपूर येथील CM हाउस, आयआयएम जम्मू आणि अहमदाबाद, लखनौ व त्रिवेंद्रम येथील अदानी विमानतळांवर इलेक्ट्रॉनिक सुरक्षा उपायांची तैनाती यांचा समावेश आहे.या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल भाष्य करताना गोदरेज आणि बॉयसच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचे व्यवसायप्रमुख आणि ईव्हीपी श्री. पुष्कर गोखले म्हणाले, "परिसर सुरक्षा आमच्या मुख्य फोकस क्षेत्रांपैकी एक आहे. जरी बाजारपेठ अत्यंत विस्कळीत असली, तरी अंदाजे 2,500 कोटी रुपयांचे बाजारपेठेसह लक्षणीय वाढीची क्षमता दिसते. सध्या आमच्या एकूण कमाईच्या 18% पर्यंत या विभागाचा वाटा आहे. ही समाधाने प्रदान करण्यात आणि राष्ट्रीय सुरक्षा पायाभूत सुविधांना बळ देण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाशी संरेखित करण्यासाठी आमच्या कौशल्याचा फायदा घेऊन, आम्ही अनेक नव्या युगातील नवी समाधाने लॉन्च करत आहोत आणि आमच्या ग्राहकांना त्यांच्या परिसराचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने या उपायांच्या परिणामकारकतेबद्दल सक्रियपणे प्रशिक्षित करत आहोत. आमचा धोरणात्मक दृष्टिकोन, नावीन्यपूर्णता आणि आमच्या ग्राहकांच्या गरजांची सखोल समज, आम्हाला त्यांच्या अनन्य गरजांवर आधारित तयार केलेले उपाय प्रदान करण्यास सक्षम करते. अलीकडच्या काळात ग्राहकांच्या वर्तनातील लक्षणीय बदल ओळखून, आमचा व्यवसाय विभाग आमच्या ग्राहकांना सर्वसमावेशक सर्व-चॅनेल अनुभव प्रदान करण्यासाठी एक धोरण सक्रियपणे स्वीकारत आहे. यामध्ये सहज ॲक्सेस आणि ग्राहक प्रतिबद्धता वाढविण्यासाठी विविध ऑनलाइन व ऑफलाइन चॅनेलवर आमची उपस्थिती वाढविणे आवश्यक आहे."
गोदरेज आणि बॉयसच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने FY 24 मध्ये परिसर सुरक्षा उपाय श्रेणीद्वारे INR 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रिमायसेस आणि इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सोल्युशन्सच्या क्षेत्रात, गोदरेजने फ्लॅप बॅरियर्स, टर्नस्टाइल्स, जीस्कॅन पोल, बोलर्ड्स, नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेरे, एक्सप्लोसिव्ह व्हेपर डिटेक्टर आणि अतिरिक्त ऑफरिंग यांसारखी नावीन्यपूर्ण उत्पादने सादर करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या व्यतिरिक्त, ब्रँड अत्याधुनिक स्कॅनिंग, स्क्रीनिंग आणि ॲक्सेस कंट्रोल सोल्युशन्सची सर्वसमावेशक लाइनअपही ऑफर करतो, ज्यामुळे कोणत्याही संभाव्य धोक्यांमुळे परिसराचा भंग होणार नाही. बॅगेज स्कॅनर, वाहन व्यवस्थापन प्रणाली, तसेच चेहऱ्यावरील आणि पूर्ण-बॉडी स्कॅनपासून सर्वकाही कव्हर करून, या मालिकेत टचलेस स्कॅनर व मेटल डिटेक्टर समाविष्ट आहेत, प्रगत तंत्रज्ञानासह सर्व प्रवेश बिंदुंसाठी उपाय दिले आहेत.
अत्याधुनिक उत्पादने आणि सोल्युशन्सच्या विस्तृत पोर्टफोलिओसह, सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसाय बँकिंग आणि वित्तीय सेवा, रिटेल, उत्पादन, आदरातिथ्य व आयटी यासह विविध उद्योगांमध्ये उत्कृष्टतेसाठी बेंचमार्क सेट करत आहे. हे उपक्रम सानुकूलित, अत्याधुनिक सुरक्षा उपाय वितरित करण्याच्या कंपनीच्या क्षमतेवर प्रकाश टाकतात, जे विविध परिसरांच्या अद्वितीय आवश्यकता पूर्ण करतात. कंपनीची तंत्रज्ञान आणि नवोपक्रमातील धोरणात्मक गुंतवणूक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि उल्लेखनीय ऑफरसह भविष्याचे रक्षण करण्याची तिची वचनबद्धता अधोरेखित करते. ताजमहाल आणि आगा खान संग्रहालय यांसारख्या प्रतिष्ठित वारसा स्थळांवर असे उपाय स्थापित केल्याने केवळ सुरक्षाच वाढली नाही, तर अभ्यागतांचा प्रवाह अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यातही मदत झाली आहे. पादचाऱ्यांच्या प्रवेश नियंत्रण सोल्युशन्सची भारतातील आघाडीची उत्पादक म्हणून, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने सेंट्रल व्हिस्टा, SDSC SHAR, NPCIL, DRDO, ISRO आणि संसद यांसारख्या गंभीर सरकारी प्रकल्पांसह धोरणात्मक भागीदारी केली आहे, ज्यामुळे परिसरामध्ये पसंतीची निवड म्हणून सुरक्षा विभागात त्याचे स्थान आणखी मजबूत होते.
Comments
Post a Comment