मुंबई: जॉन्सन 'स्कुल ऑफ जेंटल' ने मातांनी आपल्या बाळाच्या संगोपणासह आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच बाळांचे पोषक खाद्यपदार्थ घरात उपलब्ध असलेल्या साहित्यानी घरच्या घरी कसे तयार करून वापरले पाहीजेत यासाठी "जॉन्सन अँड जॉन्सन" पुढाकार घेतला असून या अंतर्गत मुंबईत ग्रँड ह्यात हॉटेल येथे 'बाळाचे आरोग्य' या विषयावर आधारित मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख वक्ते म्हणून प्रादेशिक व्यावसायिक विपणन संचालक रॉबर्ट क्व्हॉन आणि रसायनशास्त्र प्रवक्ते जेम्स केनेडी उपस्थित होते. यांनी घरगुती साहित्य वापरून आपल्या बाळाचे आरोग्य निरोगी कसे ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले. त्याचसोबत महिलांना प्रात्याक्षिक करून दाखविले यावेळी देशभरातून ८५ हुन अधिक ब्लॉगर्स माता आपल्या मुलांसह उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment